चांगली गाढ झोप येण्यासाठी काय करावे ? 

Created By: Atul Kamble

1 February 2026

चांगली झोप शरीर आणि मेंदूसाठी गरजेची असते. त्यामुळे थकवा आणि तणाव कमी होतो. स्मृती वाढते आणि कामावर एकाग्रता वाढते. चांगल्या झोपेसाठी कोणते दूध प्यावे हे पाहूयात

बदाम दूध चांगल्या झोपेसाठी गरजेचे असते. यात मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असते, जे मेंदू शात करते आणि झोप लवकर आणते.

 बदाम दूध नर्व्हस सिस्टीमला रिलॅक्स करते. रात्री बदाम दूध प्यायल्याने बेचैनी कमी होते. ज्यामुळे झोप लवकर येते आणि वारंवार झोप मोड होत नाही.

मॅग्नेशियम जास्त असल्याने बदाम दूध स्नायूंचे आखडणे कमी करुन शरीराला रिलॅक्स करते.ज्यामुळे झोप लागून सकाळी ताजेतवाणे वाटते.

बदाम दूध पचायला हलके असते. यामुळे पोट जड होत नाही. गॅसची समस्या होत नाही. त्यामुळे रात्री गाढ झोप मिळते.

 बदाम दूध स्लीप हार्मोन्स मेलाटोनिनच्या संतुलनात मदत करते. यामुळे झोपेचे चक्र सुधारते. रोज ठराविक वेळी झोप येते.

 बदाम दूधात असलेले हेल्दी फॅट आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यास चांगले करते.ब्लड सर्क्युलेशन योग्य होते आणि झोप शांत आणि गाढ येते.