हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय खायला हवं?

3 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

हृदय हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्याची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. यासाठी पौष्टीक आहार घ्यावा. 

आहारतज्ज्ञ डॉ. रक्षिता मेहरा यांच्या मते,  पालेभाज्या, कोबीमध्ये फायबर-लोह-पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के असतं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट असते. चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवते. त्यामुळे रिफाइंड तेलापेक्षा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

सॅल्मन, ट्यूना किंवा सार्डिनसारख्या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड असते. यामुळे हृदयाचे ठोके संतुलित राहतात. 

बदाम, अक्रोड आणि मनुक्यात अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे रोज 4 ते 5 बदाम खाणं फायदेशीर ठरते. 

लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो. यामुळे धमण्यात साठलेली चरबी कमी करण्यास मदत करते. लसूण कच्चा खाणं अधिक फायदेशीर ठरतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी रोज 30 मिनिटं चालावं. तसेच धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळावं. तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी.

घरात मनी प्लांट ठेवल्याने काय होतं?