फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी काय करावे ?

1 DEC 2025

Created By: Atul Kamble

रोज हलका वा मध्यम व्यायाम उदा. ब्रिस्क वॉक, जॉगिंग वा सायकल चालवणे, फुप्फुसाची क्षमता वाढवण्यास मदत करते

अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भस्त्रिका सारखे प्राणायम फुप्फुसांना मजबूत करतात.श्वसनाची क्षमता वाढवतात.

 सिगारेट-बिडीचे व्यसन फुप्फुसांचे नुकसान करते. त्यामुळे धुम्रपान सोडल्यास फुप्फुसांचे आरोग्य सुधारते.

धुळ, धुर आणि प्रदुषित हवेपासून दूर राहा. घरात एअर प्युरिफायर वापरा. बाहेर जाताना मास्क लावा

 फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी हेल्दी डाएट घ्या. हिरव्या भाज्या,फळे खाल्ल्याने लंग्सचे आरोग्य चांगले होते.

दिवसभर पुरेसे पाणी प्या. त्यामुळे आरोग्य चांगले रहाते. कफ आणि म्युकस सहजपणे बाहेर पडतो.

रोज ५ ते १० मिनिट खोल श्वास घ्या. त्यामुळे फुप्फुसाची क्षमता आणि ऑक्सिजन घेण्याची शक्ती वाढते. 

दम लागणे, खोकला वा अन्य लक्षणे वारंवार दिसत असतील तर फुप्फुसाची तपासणी करा.यामुळे गंभीर समस्येपासून वाचता येईल.