ही लक्षणे दिसली की समजावं म्हातारपण आलं.

07 November 2023

Created By : Mahesh Pawar

शारीरिक गोष्टींत जो बदल घडला त्याकडे कानाडोळा करून जसं काही घडलेच नाही असे भासवत असतो.

अचानक आजोबा अशी हाक कानी आल्यावर मात्र दचकायला होते. 

स्वभावाला मुरड घालून जीवन जगायला लागला की समजावं म्हातारपण आलं. 

जाऊ दे, आपल्याला काय करायचं, हे पालुपद तोंडात यायला लागलं की समजावं म्हातारपण आलं.

चालताना, कुठलेही काम करताना वेगावर नियंत्रण आले की समजावं म्हातारपण आलं.

हिल स्टेशन, प्रसिद्ध शहरे सोडून देवस्थानाला जाण्याची ओढ निर्माण झाली की समजावं म्हातारपण आलं.

पुस्तकाच्या स्टॉलवर भगवद्गीते सारखा ग्रंथ घ्यावासा वाटलं तर नक्कीच म्हातारपण आलं.

बरीचशी व्यसने आयुष्यभर जपली पण आता काहीच प्रयत्न न करता त्यांचा कंटाळा येत असेल तर समजावं...