हाय बल्ड शुगरच्या रुग्णांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत ?
Created By: Atul Kamble
4 June 2026
हाय ब्लड शुगरची समस्येत खानपानाची नीट काळजी घ्यावी. काही पदार्थांच्या सेवनाने वेगाने साखर वाढू शकते. संतुलित आहार आणि व्यायाम याने शुगरची समस्या दूर होऊ शकते.
कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, गोड चहा, पॅकबंद ज्युसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यांच्या सेवनाने ब्लड शुगर वाढू शकते.
गुलाम जाम, मिठाई, केक, पेस्ट्री, रसगुल्ला यात साखरेचा अतिरेक असतो. त्यांच्या सेवनाने रक्तातील साखर वाढू शकते.
पांढरा ब्रेड,पिझ्झा, बर्गर आणि मैद्यापासून तयार झालेले पदार्थांमुळे सारखेचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यांच्या दूर राहणेच उत्तम..
चिप्स, फरसाण, कुकीज आणि अन्य प्रोसेस्ड स्नॅक्समध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट आणि चरबी असते. त्यांचे सेवन आरोग्यासाठी योग्य नसते.
द्राक्षे, आंबा, चिकू,लिची सारख्या फळाने जास्त साखर वाढते. त्यामुळे यांच्या सेवन जपून करावे. तज्ज्ञांचा सल्ल्याने कोणत्याही फळांचे सेवन करणे उत्तम.
फ्लेवर्ड दही, मिल्कशेक आणि गोड कंडेंस्ड दूधासारखे उत्पादनात अतिरिक्त साखर असते. यांच्या सेवनाने ब्लड शुगर प्रभावित होऊ शकते.