कोणत्या भाज्या ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतात 

Created By: Atul Kamble

10 March 2026

शुगर कंट्रोल करण्यात आहाराचा देखील मोठा वाटा असतो. काही भाज्यात पोषक तत्वे आणि फायबर भरपुर असते. त्यांनी रक्तातील साखर नियंत्रित रहाते.

कारले शुगर कंट्रोल करण्यात मदतगार मानले जाते. यात काही तत्वे इन्सुलिन सारखी काम करु शकतात. नियमित सेवन केल्याने फायदा होतो.

पालक पोषक तत्वे आणि फायबरने भरपूर असते, याच्या सेवनाने शरीराला पोषण मिळते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल संतुलित राखण्यास मदत मिळते

दूधी भोपळ्याची भाजी कमी कॅलरी आणि पोषक तत्वे जास्त असलेली भाजी आहे. नियमित सेवन केल्यास शुगर कंट्रोल होते.

मेथीच्या भाजीत फायबर आणि अनेक जीवनतत्वे असतात. याचे सेवन ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत करते. पचनाला ही भाजी चांगली असते. 

 कोबीत फायबर आणि एंटीऑक्सिडेंट तत्वे असतात. ही भाजी शरीराला पोषक आणि ब्लड शुगर नियंत्रित करणारी असते.

ब्रोकलीत अनेक पोषक तत्वे असतात. फायबर जास्त असलेली ही भाजी ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत करते

(  डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )