Created By: Atul Kamble

09 May 2026

दही खाल्ल्याने शरीराला कोणते व्हिटामिन्स मिळतात ?

उन्हाळ्यात दही खाणे शरीरासाठी फायदेमंद मानले जाते. दही खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. पचन चांगले होते. शरीराला आवश्यक व्हिटामिन्स मिळण्यास मदत होते.

दह्यात व्हिटामिन्स बी-१२ सापडते. जे शरीरात रक्त वाढवणे, कमजोरी दूर करणे आणि नसांना आरोग्यदायी राखण्यास मदत करते.

दह्यातील व्हिटामिन्स बी-२ शरीराला एनर्जी देण्यास मदत करते. यामुळे थकवा कमी होतो. आणि शरीर एक्टीव्ह होते.

दह्यात व्हिटामिन्स डी देखील असते. ते कॅल्शियम शोषण्यास मदत करते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

दह्यातील व्हिटामिन्स ए डोळ्यांचे आरोग्य सुधारते.तसेच त्वचा आणि इम्युनिटी चांगली करण्यास मदत करते.

दह्यातील गुड बॅक्टेरिया पोटाचे आरोग्य राखतात. पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे कब्ज आणि गॅसची समस्या कमी होते.

उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. ड्रीहायड्रेशनपासून वाचण्यास मदत मिळते.