24 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
थायलंड हे भारतीयांचं आवडतं ठिकाण आहे. आकडेवारीनुसार, 2024 मध्ये 21 लाख भारतीायंनी थायलंडला भेट दिली.
भारतीयांना थायलंड आवडण्याची एक दोन नाही अनेक कारणं आहेत. त्यापैकी 5 कारणे जाणून घ्या.
थायलंडमध्ये भारतीयांना व्हिसा सुविधा मिळते. विमानतळावरून 15 ते 30 दिवसांसाठी उपलब्ध आहे. ऑनलाईन व्हिसाची सुविधा देखील आहे.
कमी बजेटमध्ये थायलंड सहल आखता येते. थायलंड 4-5 दिवसांची सहल 25 ते 40 हजारात होते.
थायलंडचे नाईटलाइफ लोकप्रिय आहे. पटाया आणि बँकॉक हे ग्रुप टूर, बॅचलर पार्ट्या आणि ग्रुपसोबत प्रवास करणाऱ्यांसाठी खास आहे.
थायलंडची बाजारपेठ आणि अन्न भारतीयांना आकर्षित करते. चतुचक मार्केट, एमबीके मॉल, पटाया या बाजारपेठा आहेत.
थायलंडमध्ये भारतीयांना समुद्र, बेट आणि निसर्गाचा संग पाहण्याची संधी मिळते. हत्ती सफरी आणि जलक्रीडा लोकांना आवडते.