थंडीत बद्धकोष्ठतेची समस्या का होते ? काय असतात लक्षणे ?

Created By: Atul Kamble

5 january 2026

 थंडीत शरीराच्या हालचाली कमी  होतात. घाम कमी निघतो. त्यामुळे पाणी कमी पिले जाते. फायबरची कमतरता. तळलेले पदार्थांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता वाढते.

पोट स्वच्छ न होणे हे पहिले लक्षण असते. शौचाला गेल्यानंतरही पोट जड वाटणे.फुगल्यासारखे वाटणे

मलाची प्रवृती कठीण होत असते. त्यामुळे जोर लावूनही ते सहज बाहेर येत नाही. ज्यामुळे वेदना आणि त्रास होऊ शकतो.

दीर्घकाळ बद्धकोष्ठतेने पोटात गॅस तयार होतो.यामुळे पोटात दुखते.सूज आणि बैचेनी जाणवते

पोट नीट साफ न झाल्याने पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे भूक कमी होते. खाण्याची इच्छा कमी होते.

 बद्धकोष्ठतेमुळे शरीरावर परिणाम होतो. सतत पोट खराब झाल्याने थकवा, जडपणा आणि चिडचीड वाढते.

बद्धकोष्ठता वाढल्याने शरीरातील घाण बाहेर पडत नाही.काही लोकांना मळमळ, डोके जड होते. विनाकारण बैचेनी जाणवते.