वाईनची बॉटल लाल रंगाने भरलेल्या बादलीत का डुबवतात? माहीत आहे का?

02 July 2025

Created By: Shweta Walanj

वाईनची बॉटलवर झाकण लावल्यानंतर पॅक करण्याआधी लाल रंगाने भरलेल्या बादलीत डुबवतात.

वाईनच्या बॉटलवर अशी प्रक्रिया का करतात, जाणून घेऊ...

जेव्हा तुम्ही वाईनची बॉटल खोलता, तेव्हा त्यावर लाल रंगाचं सील किंवा मेणाने बंद केलेली असते.

ही प्रक्रिया बॉटल चांगली दिसण्यासाठी नाहीतर, यामागे महत्त्वाचं कारण आहे.

लाल वॅक्सचं काम बॉटलच्या (कॉर्क) लाकडी झाकणाला सुरक्षित ठेवणं असतं.

बॉटलमध्ये हवा जाऊ नये म्हणून असं केलं जातं.

कॉर्क सुकल्यानंतर ऑक्सिजन आज  जाऊ शकतो ज्यामुळे वाईन खराब होऊ शकते.

प्राचीन काळी, जेव्हा लांब प्रवासात वाइन पाठवली जात असे, तेव्हा कीटक कॉर्कपर्यंत पोहोचू नयेत आणि वाइन सुरक्षित राहावे म्हणून या मेणाच्या सीलचा वापर केला जात असे.