14 APRIL 2024

महाराष्ट्रात असेही आहेत दोन डोंगरांवर बांधलेले जोड किल्ले, तुम्हाला माहित आहेत का?

Mahesh Pawar

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हे इतिहास प्रसिद्ध जोड किल्ले आहेत. अंकाई आणि टंकाई हे ते दोन किल्ले आहेत.

अंकाई टंकाई हे जोड किल्ले यादव काळापासून आहेत. अंकाई किल्ला देवगिरी किल्ल्यापेक्षा जुना असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अंकाई किल्ल्याचा शके 947 मध्ये श्रीधर दंडनायक हा द्वारपाल होता, अशी नोंद सापडते. यादव काळात या किल्ल्याचा उल्लेख एककाई दुर्ग असा येतो.

मोगल बादशाह शाहजहान याचा सुभेदार खानेखानान याने 1635 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला.

फ्रेंच प्रवासी थेवेनोट याने इ. स. १६६५ साली अंकाई किल्ला हा सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे. 

पेशवा आणि निजाम संघर्षात भालकीच्या तहानुसार अंकाई टंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले.

इ.स. 1818 मध्ये इंग्रज अधिकारी मैकडोवेल याने गडावर तोफांचा मारा केला. गडावरील शिबंदीही इंग्रजाना शरण गेली आणि हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले.

सातमाळ रांगेच्या अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते तेथे अंकाई टंकाई किल्ले आहेत.

जगातील प्रत्येक राष्ट्राने स्वतःचा राष्ट्रध्वज आहे. मात्र, यातील काही देशांचे राष्ट्रध्वज हे प्राचीन काळापासून वापरले जात आहेत.

युध्दशास्त्राच्या दृष्टीने या किल्ल्यांना बळकट करण्यासाठी कात्रा, मेसणा, गोरक्षगड, माणिकपुंज यासारख्या उपदुर्गांची साखळी तयार केली गेली आहे.

या उपदुर्गांचा वापर प्रामुख्याने मुख्य किल्ल्याचे रक्षण आणि टेहळणीसाठी करण्यात येत होता.