मुंबईतील सर्वात महागड्या मलबार हिल भागात एक जुना बंगला आहे. 40 वर्षांपासून हा बंगला ओसाड आहे.
09 February 2025
मुंबईत मलबार हिलमध्ये असणाऱ्या या बंगल्याच्या जवळ रुईया आणि जिंदाल यांच्यासारखे बडे उद्योगपती राहत आहे.
बंगल्याचे नाव साऊथ कोर्ट आहे. त्याला जिन्ना हाऊस म्हणून ओळखले जाते.
सुमारे 78 वर्षांपूर्वी या बंगल्यात भारताची फाळणी करण्याचा कट शिजला होता.
मलबार हिलमधील या बंगल्याचे मालक पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीन्ना होत
े.
जिन्ना यांच्याजवळ लंडन हाऊसमध्ये एक आलीशान घर होते. ते विकून त्यांनी मुंबईत हा बंगला घेतला.
जिन्ना यांनी 1936 मध्ये हा बंगला बनवला. त्यावेळी त्याची किंमत 2 लाखांमध्ये हा बंगला तयार झाला.
आता या बंगल्याची किंमत एक हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते.
फळणीनंतर जिन्ना पाकिस्तानात गेले. परंतु त्यांनी हा बंगला विकला नाही.
मोहम्मद अली जिन्ना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या बंगल्याबाबत वाद सुरु झाला.
भारत सरकारने जिन्ना यांचा हा बंगला ब्रिटीश हायकमिशनला दिला. 1981 पर्यंत जिन्ना हाऊस बिटीश हायकमिशनचे कार्यालय होते.
1981 नंतर इंडियन काउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) कडे हा बंगला दिला.
त्यानंतर जिन्ना यांचा हा बंगला शत्रू राष्ट्राची संपत्ती घोषित करण्यात आली. आता हा बंगला भारत सरकारच्या ताब्यात आहे.
हे ही वाचा...
रस्त्यात मुंगूस दिसल्यावर काय मिळतात संकेत