संजय राऊतांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडालीय

20 November 2023

Created By: Chetan Patil

राऊतांनी कसिनोतला फोटो ट्विट केलाय

एका नेत्याने कसिनोत 3.50 कोटी रुपये उडवल्याचा दावा राऊतांनी केलाय.

त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय. भाजपने आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करत निशाणा साधलाय.

बावनकुळेंनी फोटो शेअर करत स्पष्टीकरण दिलंय. आपण रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासोबत होतो, असं ते म्हणाले

आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो, त्याच्या तळमजल्याला रेस्टॉरंट आणि कसिनो असल्याचं ते म्हणाले. 

तर भाजपने बावनकुळे यांनी कधीच जुगार खेळला नसल्याचं म्हटलंय. 

तर देवेंद्र फडणवीसांनी यावरुन राऊतांवर 'सडकी मानसिकता' म्हणून टीका केली