पिंपळाच्या पानावर अवतरले प्रभू श्रीराम..

22 January 2024

Created By : Manasi Mande

अयोध्येत आज राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

देशभरातील नागरिक या सोहळ्यामुळे आनंदी आणि उत्साहित आहेत.

यानिमित्त राजस्थानमधील कलाकाराने पिंपळाच्या पानावर प्रभू रामाचे चित्र रेखाटले आहे.

श्रवण कुमार या कलाकाराची अजोड कामगिरी पाहून सर्वच थक्क झाले आहेत.

पिंपळाच्या पानावर त्याने प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे चित्र कोरले आहे.

त्याच्या या कलाकृतीचे फोटो बरेच व्हायरल झाले आहेत