IAS सोनल गोयल यांनी सोशल मीडिया अकाउंट 'एक्स' वर आपल्या मेन्स एग्झामची मार्कशीट शेअर केली.

23 february 2024

सोनल गोयल यांनी 2008 मध्ये UPSC परीक्षेत ऑल इंडियामध्ये 13 रँक मिळवली होती.  

सोनल यांनी 2007 मधील मार्कशीट शेअर केली. त्यावेळी त्यांना युपीएससीत अपयश आले होते. 

सोनल म्हणतात, पहिल्या प्रयत्नात जनरल स्टडीजमध्ये कमी मार्क्स मिळाले. त्यामुळे मुलाखतीपर्यंत जाऊ शकली नाही. 

पहिल्या अपयशानंतर मी जिद्दीने दुप्पट्ट मेहनत केली. वर्षभरात यश मिळवले. 

जनरल स्टडीज यश मिळवण्यासाठी नोट्स करणे, वारंवार पाठांतर, उत्तर लिहिण्याचा सराव करत राहिली. 

युपीएससी परीक्षाच्या प्रत्येक पैलूवर मी झोकून देऊन काम केले, असे सोनल गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले.