एक उंदीर पकडण्यासाठी किती खर्च येणार? या प्रश्नाचे उत्तर 41 हजार रुपये.

ऐकून धक्का बसला ना. परंतु भारतीय रेल्वेने हा खर्च केला आहे.

भारतीय रेल्वेने तीन वर्षांत 168 उंदीर पकडले असून 69 लाख रुपये खर्च केले.

रेल्वेचा लखनऊ विभागाने हा खर्च केला आहे. 

आरटीआय कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी यासंदर्भात माहिती मागितली होती.

उंदीर पळवण्यासाठी घराघरात कुत्रे, मांजरचा वापर होतो. 

उंदीर पकडण्याचा रेल्वेचा फंडा मात्र चांगलाच महाग पडला आहे.