मिझोरामच्या एका तरुण महिला आमदाराची जोरदार चर्चा सुरु आहे
7 December 2023
Created By: Chetan Patil
मिझोराममध्ये नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जोरम पिपल्स मूव्हमेंटचा (ZPM) मोठा विजय झाला.
ZPM पक्षाला 27 जागांवर विजय मिळालाय. ZPM पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार बेरिल वन्नेइहसांगी यांची जोरदार चर्चा आहे.
बेरिल वन्नेइहसांगी या मिझोरामच्या सर्वात तरुण महिला आमदार ठरल्या आहेत. त्या 32 वर्षांच्या आहेत. बेरिल यांच्या सौंदर्याचंदेखील कौतुक होत आहे.
बेरिल या आयजोल जिल्ह्यातील तिसऱ्या जागेवरुन जिंकून आल्या आहेत.
बेरिल राजकारणात येण्याआधी अँकर आणि रिडिओ जॉकी होत्या. त्यांना ZPM पक्षाने जेव्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं तेव्हा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
बेरिल वन्नेइहसांगी यांनी एमए डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
बेरिल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या सोशल मीडिया स्टार आहेत.