अंबानींची कंपनी बंगालमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार

21 November 2023

Created By: Chetan Patil

मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.

अंबानी यांची कंपनी पश्चिम बंगालमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे ममता यांच्या सरकारला मोठा फायदा होणार आहे.

रिलायन्स कंपनी बंगालमध्ये पुढच्या तीन वर्षात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

पश्चिम बंगालच्या 7व्या ग्लोबल बिझनेस शिखर संमेलनात मुकेश अंबानी यांनी याबाबतची घोषणा केली.

रिलायन्स रिटेलचे बंगालमध्ये सध्या 1000 स्टोअर्स आहेत. त्यानंतर कंपनी आणखी 200 स्टोअर्स सुरु करणार आहे.

रिलायन्स कंपनी बंगालमध्ये पुढच्या तीन वर्षात 100 कंप्रेस्ड बायोगॅस प्लांट लावणार आहे. त्यामुळे 55 लाख टन ऑरगॅनिक आणि अ्ॅग्रिकल्चर कचऱ्याचा बंदोबस्त होईल

रिलायन्स इंडस्ट्रीने आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये 45 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.