17 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वूमन्स टीम इंडियाला आयसीसीकडून जवळपास 40 कोटी रुपये प्राईज मनी देण्यात आलं.
क्रिकेट वर्ल्ड कपच्या तुलनेत फिफा वर्ल्ड कप 2026 विजेत्या संघाला 10 पट जास्त रक्कम मिळणार आहे.
फीफा काउन्सिलने आगामी वर्ल्ड कपसाठी प्राईज मनी जाहीर केली आहे. ही रक्कम गेल्या वर्ल्ड कपच्या तुलनेत 8 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.
अर्जेंटीनाने 2022 साली वर्ल्ड कप जिंकला. तेव्हा अर्जेंटीनाला 42 मिलियन डॉलर अर्थात 350 कोटी इतकी रक्कम मिळाली.
आगामी वर्ल्ड कप विजेत्या टीमला 50 मिलियन डॉलर अर्थात 452 कोटी प्राईज मनी मिळणार आहे. तर उपविजेत्याला 33 मिलियन डॉलर अर्थात 298 कोटी रुपये मिळणार आहेत.
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत 48 संघ सहभागी होणार असल्याने प्राईज मनीत वाढ करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्पर्धेच्या ड्रॉमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील 48 संघांना 12 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं होतं.