हरमनप्रीत कौर आणि युवराज यांचा या स्टेडियममध्ये होणार सन्मान

29 November 2025

Created By: Atul Kamble

टीम इंडिया महिला विश्वचषक जिंकल्याने कप्तान हरमनप्रीत कौरचा सर्वत्र गौरव होत आहे

 बीसीसीआयने हरमनप्रीतला पुरस्कार दिला आहे.आता पंजाब स्टेट क्रिकेट असोसिएशन देखील सन्मान करणार आहे.

 पंजाब क्रिकेट असोसिएशन त्यांच्या स्टेडियमच्या एका स्टँडला हरमनप्रीतचे नाव देणार आहे.

 मुल्लांपूर येथील नव्या क्रिकेट स्टेडियमच्या एका स्टँडला वर्ल्ड चँम्पियन भारतीय कप्तान हरमनप्रीतचे नाव देणार आहे.

पंजाब सरकार दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंह याचे नाव देखील एका स्टँडला देणार आहे.

भारत-साऊथ आफ्रीकेच्या मुल्लांपुरमधील चौथ्या टी-२० मॅच दरम्यान दोघांचा सन्मान होणार आहे.

 हरमनप्रीत कौर आणि युवा ऑलराऊंडर अमनजोत कौर यांना प्रत्येकी ११ लाख रुपये देण्यात येणार आहेत.