19 वर्षीय वर्ल्ड चेस चॅम्पियन दिव्या देशमुखचं नेटवर्थ किती? आकडा कोटींच्या घरात

28 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

नागपूरच्या दिव्या देशमुख हीने इतिहास रचला. दिव्याने फिडे वूमन्स चेस वर्ल्ड कपचा खिताब पटकावला. 

दिव्या देशमुखने अंतिम फेरीत कोनेरु हंपीचा पराभूत करत चेस वर्ल्ड कप जिंकला. दिव्या यासह चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. 

दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली.  दिव्याचं या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. 

वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप अंतिम फेरीतील 2 सामने बरोबरीत राहिले. त्यानंतर रविवारी ट्रायब्रेकरमध्ये विजेता निश्चित झाला

ट्रायब्रेकरमधील पहिला रॅपिड गेम बरोबरीत राहिला. त्यानंतर दुसऱ्या गेमही बरोबरीत राहणार असं वाटत होतं.  

मात्र दिव्याने केलेल्या चालीमुळे प्रतिस्पर्धी हंपी दबावात आली. या दबावात हंपीने काही चुका केल्या. दिव्याने याचा फायदा घेतला आणि विजय मिळवला. 

रिपोर्ट्सनुसार, दिव्या देशमुख हीचं नेटवर्थ 7-8 कोटी रुपये  आहे. दिव्याचं चेस हेच उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या