Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

 11 July 2026

Created By: Atul Kamble

Anjali Anand : बॉडीटाईप पाहूनच मिळाली संधी, अभिनय पाहून नाही,  अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

Created By: Atul Kamble

अभिनेत्री अंजली आनंद हीने सांगितले की तिला आतापर्यंत या इंडस्ट्रीने तिच्या लूकमुळेच संधी दिली आहे.माझं टॅलेंट आणि अभिनय पाहून मला ब्रेक मिळाला नाही.

 मेकर्सने नेहमीच माझी बॉडी पाहूनच मला कास्ट केले. ज्यानंतर त्यांना कळाले की मला अभिनय देखील येतो. त्यानंतर मला चांगल्या वेगवेगळ्या भूमिका मिळाल्याचे अभिनेत्री अंजली आनंद हीने सांगितले.

 पहिला शो 'अनटॅग' देखील मला माझ्या बॉडीमुळे मिळाला होता. नंतर 'रात जवान है', आणि 'डब्बा कार्टेल' सारख्या शोमध्ये काही चांगले कॅरेक्टर करायला मिळाल्याचे अंजली आनंद हीने सांगितले.

 अंजलीला पहिला ब्रेक मालिका 'अनटॅग' मुळे मिळाली. त्यानंतर 'ढाई किलो प्रेम' मध्ये ती दिसली. तिला तिच्या वजनाच्या प्रमाणेच रोल मिळाल्याचे ती म्हणते.

 असाच काहीसा रोल 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये पाहायला मिळाला. यात तिने रणवीर सिंह याच्या लहान बहिणीचे गायत्री अर्थात गोलू रंधावा हे कॅरेक्टर साकारले आहे.

 मी आणखी चांगल्या रोलची वाट पाहात आहे. अजूनही मला असे कॅरेक्टर करायचे आहे. ज्यात माझ्या शरीराचे काहीही घेणेदेणे नाही असे अंजली आनंद सांगते