'हीरामंडी' मधल्या या परदेशी कलाकाराने फरहान अख्तरच्या मेहुणीला डेट केलय. 

'हीरामंडी' मधल्या मिस्टर कार्टराइटच्या रोलमुळे  जेसन शाहच भरपूर  कौतुक होतय. 

जेसन शाह 8 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे. पण  याआधी असं प्रेम मिळालं  नाही, असं त्याने सांगितलं. 

पर्सनल, प्रोफेशन लाइफमध्ये बरेच बदल झालेत. इशाऱ्या इशाऱ्यात त्याने अनुषा  दांडेकर सोबतच्या ब्रेकअपवर  भाष्य केलं.

माझ्या शेवटच्या ब्रेकअपमुळे आयुष्यात बराच बदल झाला. मी अध्यात्मिक झालोय. आधीपेक्षा जास्त समजदार झालोय असं  जेसन म्हणाला.

मी घाईगडबडीत ब्रेकअप केलं. याचा आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार केला नाही. दुसरी व्यक्ती मला  समजून घेत नव्हती.

आता कोणाला डेट करतोय, यावर उत्तर न देता त्याने  विषय तिथेच संपवला.

'हीरामंडी'नंतर जेसन बिग बॉसमध्ये दिसू शकतो. अनुषा सिंगर-मॉडेल आहे. ती शिबानी दांडेकरची छोटी बहिण आहे.