'लापता लेडीज' मधील फूलच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहूनच  प्रेक्षक तिच्या  प्रेमात पडतायत. 

किरण रावने दिग्दर्शित केलेला 'लापता लेडीज' सिनेमा नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर वन आहे. 

'लापता लेडीज' मधील  फूलचा रोल साकारणारी  नितांशी गोयल रातोरात  हिट झालीय. 

अलीकडेच  नितांशी गोयलने एका मुलाखतीत 'लापता लेडीज' नंतर तिचं आयुष्य बरच बदलल्याच सांगितलं.

नितांशी गोयल म्हणजे फूलला आतापासूनच लग्नासाठी मागण्या येण्यास सुरुवात झालीय. येणारी पत्र वाचून मी आनंदी आहे. 

नितांशी गोयल आता फक्त 16 वर्षांची आहे. सोशल मीडियावर ती भरपूर एक्टिव आहे.  फूल खऱ्या आयुष्यात  खूप ग्लॅमरस आहे.

स्क्रिप्ट वाचल्यानंतरच यात काम करायच हे तिने ठरवलेलं. ऑडिशनसाठी पूर्ण रात्रभर तयारी केलेली. काही जुने चित्रपटही पाहिलेले.