सध्या सर्वत्र 'लापता लेडीज' चित्रपटाची चर्चा आहे.  या चित्रपटातून एका  'मराठी अभिनेत्रीने  छाप उमटवलीय. 

'लापता लेडीज'मध्ये छाया कदमने मंजू माईचा रोल  केलाय. स्वबळावर उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा  तिचा रोल आहे.

चित्रपटाच्या पडद्याप्रमाणे खऱ्याखुऱ्या आयुष्यात छाया कदम सक्षम, स्वावलंबी, कणखर महिला आहे. 

मध्यमवर्गीय कुटुंबात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. आज अभिनय क्षेत्रात  त्यांचं नाव आहे. 

शाळेपासूनच स्टेजवर  परफॉर्म करण्यात  छाया कदम  आघाडीवर असायच्या.

अभिनयाची आवड होतीच.  पण त्या राष्ट्रीय स्तरावरच्या कबड्डीपटू सुद्धा होत्या.

राष्ट्रीय स्तरावरचे कबड्डी  सामने त्यांनी  खेळले आहेत.

अभिनेत्री असली, तरी छाया कदम यांनी  टेक्सटाइल डिजाइनमध्ये  ग्रॅज्युएशन केलय.