बुरखा घालण्याची जबरदस्ती केल्याने सना खान ट्रोल्स,संभावना सेठला दिला होता सल्ला

04 March 2025

Created By: Atul Kamble

ग्लॅमर इंडस्ट्री सोडून हिजाब घालणारी अभिनेत्री सना खान हीने रमजानच्या मुहूर्तावर आपले पॉडकास्ट सुरु केले,त्यात तिने अभिनेत्री संभावना सेठला बोलावले

हे पॉडकास्ट सुरु करण्याआधी संभावनावर सना चिडते, तू ओढणी- सलवार घेऊन यायला हवे होते असे म्हणते

व्हायरल व्हिडीओत संभावना ही सना हिला जरा व्यवस्थित कपडे घालायचे ना? असा सल्ला देते

चांगली सलवार कमीझ घालायची ना. दुप्पटा घेतला ना, सलवार घातली ? कुठे आहे तुझा दुप्पटा असे सना तिला विचारते

संभावना म्हणते पहा आली शेवटी असली रंगावर, सना ओरडते बुरखा आणि ओढणी आण,कानात चांगले झुमके घालते. मग चांगली दिसेल असे उत्तर सना देते..

त्याला उत्तर देताना सना म्हणते वाह रमझानमध्ये न दुपट्टा अन् सलवार, अन् कानात झुमके घालणार ?ही कुठली पद्धत,संभावना तू बुरखा घाल.

मग संभावना आपला पायजमा दाखवत म्हणते माझे वजन खूप वाढलंय..कोणतेच कपडे येत नाही.१५ किलोने वजन वाढलेय

उत्तर देताना सना म्हणते की आत काही घातले असते. वर जॅकेट घातले असते. आम्ही कसे घालतो. जसा किमोनो असतो.ते घालून बसली असतीस तर

 संभावना मग तिला म्हणते की दे मग किमोनो, चाहते माणसावर प्रेम करतात कपड्यांवर नाही,सर्वकाही चालते असेही सांगते

 सनाकडून असे संभावना वर कपड्यांचा दबाव टाकल्याने युजर्स नाराज होऊन सनाला ट्रोल करीत आहेत.सगळ्यांवर ती आपला सल्ला का थोपते असे टीका युजरने केली आहे