शिवरायांनी केलेल्या त्या वधाचा साक्षीदार! प्रतापगडाची ही अनोखी गोष्ट अनेकांना माहितच नाही

13 ऑक्टोबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

प्रतापगडाची बांधणी 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाची उभारणी केली. पार घाटाच्या संरक्षणाच्या दृष्टिने या किल्ल्याला विशेष महत्त्व होतं. डोंगराळ भागात उभारलेला हा गड स्वराज्याच्या संरक्षणव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग होता.

अफजलखानाच्या वधाचा  साक्षीदार   प्रतापगडाचं नाव घेतलं की महाराज आणि अफजलखान यांच्यात झालेल्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण होते. 10 नोव्हेंबर 1659 रोजी किल्लाच्या पायथ्याशी जो वध झाला. त्यामुळे प्रतापगडाला महाराष्ट्रात विशेष स्थान मिळालं

प्रतापगडाची रचना  प्रतापगडाची रचना वरचा आणि खालचा  किल्ला अशा दोन भागांत विभागलेली आहे. किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी आणि बुरूज उभारण्यात आले आहेत.शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी या रचनेचा वापर होत असे

1080 किमी उंचावर  वसलेला प्रतापगड  समुद्रसपाटीपासून 1080 मीटर उंचीवर असलेल्या प्रतापगडाचं स्थान लष्करी दृष्टिने महत्त्वाचं होतं.  उंच डोंगरावर असल्याने आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवता येत असे. गडावरून दिसणारा डोंगराळ परिसर पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

प्रतापगडावरील  भवानी मातेचे मंदिर प्रतापगडावरील असलेलं भवानी मंदिर हे  गडावरील महत्त्वाचं धार्मिक स्थळ होतं. या मंदिराशी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार मिळाल्याची  मान्यता जोडलेली आहे. त्यामुळे  बरेच भाविक इथे दर्शनासाठी येत असतात.

अफजलखानाची कबर  प्रतापगडाच्या परिसरात अफजलखानाची  कबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या ऐतिहासिक संघर्षाशी संबंधित असल्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे

प्रतापगडावर कसं पोहोचायचं? प्रतापगडावर जाण्यासाठी महाबळेश्वरहून  अंतर 20 ते 25 किमी आहे. तिथून खासगी बसच्या मदतीने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येतं.

वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक  स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत  नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश  नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून  कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.