भारतात हायपरलूप रेल्वे सुरु करण्याच्या योजनेवर वेगाने काम सुरु आहे.
1 March 2025
देशात सर्वात पहिली हायपरलूप रेल्वे मुंबई ते पुणे दरम्यान धावणार आहे. यामुळे तीन ते चार तासांचे आंतर 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
माध्यमांमधील वृत्तानुसार, एका हायपरलूप रेल्वेत 24 ते 28 जण बसू शकतील. हा प्रवास जलद आणि रोमांचक असणार आहे.
हायपरलूप वेगाने धावणारी रेल्वे आहे. त्यात व्हॅक्यूम ट्यूबमध्ये मॅग्नेटिक तंत्रज्ञानाने चालणाऱ्या पॉड्सचा वापर करता येतो.
हायपरलूप ट्रेन 1100 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. ही जगातील सर्वात वेगाने धावणारी रेल्वे आहे.
हायपरलूप ट्रेनसाठी कमी वीज लागते. तसेच त्यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही. पर्यावरणासाठी ही फायदेशीर आहे.
2019 मध्ये हायपरलूप रेल्वेची चाचणी यशस्वी झाली होती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच या रेल्वेचा एक व्हिडिओ शेअर केला.
रेल्वे मंत्रायल आणि आयआयटी मद्रास मिळून या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासाठी रेल्वेने आयआयटी मद्रासला एक मिलियन डॉलरची मदत दिली आहे.
हे ही वाचा... देशातील सर्वात मोठ्या घराची मालक आहे क्रिकेटरची ही पत्नी, मुकेश अंबानींच्या घरापेक्षा अनेक पट मोठे घर