26 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याचा शेवट आणि ऑगस्ट महिन्याचा सुरुवात काही राशींसाठी चांगला असणार आहे. 28 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंतचा काळ अनुकूल असेल.
जुलै महिन्याचा शेवटचा आठड्यात काही दुर्मिळ योग जुळून येणार आहेत. यामुळे काही राशींचं भलं होणार आहे.
चला जाणून घेऊयात पुढचा आठवडा कोणत्या राशींसाठी खास असणार आहे ते...
मेष राशीसाठी येणारा आठवडा उत्साहाने भरलेला असेल. कौटुंबिक पातळीवर आनंद असेल. तसेच उत्पन्नात वाढ होऊ शकते.
सिंह राशीच्या जातकांनाही हा आठवडा चांगला जाईल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. नव्या संधी मिळतील.
कन्या राशीच्या जातकांनाही आठवडा लाभदायी असेल. प्रवासाचा योग जुळून येऊ शकतो. करिअरमध्ये उन्नती होऊ शकते.
धनु राशीच्या जातकांना या काळात मानसन्मान मिळेल. आर्थित स्थिती चांगली राहील. तसेच नात्यात गोडवा निर्माण होईल.