9 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
दारु न पिता जर फॅटी लिव्हर झाला तर त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज म्हटले जाते. याला आधीच ओळखता येते.
जर तुम्हाला मेहनत न करताही दिवसभर थकवा जाणवत असेल तर हे फॅटी लिव्हरचा संकेत असू शकतो.
जेव्हा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज होतो तेव्हा पोटात खूप जडपणा जाणवतो.तसेच शौचास त्रास होतो.
NAFLD झाल्यास पोटाच्या वरच्या भागात वेदना होऊ लागतात,त्या सहज कमी होत नाहीत.औषधही ही वेदना बरी करु शकत नाही.
जेव्हा अब्डोमिनल केव्हीटीमध्ये फ्लूड जमा होऊ लागते तेव्हा ब्लॉटिंग होते.जर वेळीच इलाज केला नाही तर इंफेक्शनचा धोका वाढतो.
एका अभ्यासानुसार फॅटी लिव्हरमध्ये पोटात गॅस बनने, पचन योग्य प्रकारे न होणे,हर्टबर्न आणि ढेकरचा त्रास होतो.
नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर आजारात हाताचे तळवे नेहमी लाल होतात.ही सर्व लक्षणे दिसताच डॉक्टरांची भेट घ्या.