गरुड पुराणानुसार कोणत्या कर्माचं फळ कसं मिळतं? जाणून घ्या 

5 जून 2025

Created By:  संजय पाटील

गरुड पुराण हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. ग्रंथात मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं?  तसेच कर्मांनुसार कोणती शिक्षा मिळते? याबाबत माहिती आहे. 

व्यक्ती जसं जिवंतपणी कर्म करतो त्यानुसारच मृत्यूनंतरही  तसं फळ मिळतं.

चांगलं कर्म करणाऱ्याला स्वर्ग तर वाईट काम करणाऱ्यांना नरकायातना सहन कराव्या लागतात.  पुढील जन्मातही त्या कर्माची फळं भोगावी लागतात.

आत्म्याला कर्मानुसार  यमलोकातील 165 नगरांमधून जावं लागतं. जिथे कर्मानुसार वेगवेगळ्या नरकात पाठवलं जातं

गरुड पुराणानुसार ब्राह्मण हत्या सर्वात मोठा गुन्हा आहे. असं कृत्य करणाऱ्याला घोर नरक यातना सहन कराव्या लागतात

हिंदू धर्मात गायला देवाचा दर्जा आहे. गो हत्या सर्वात मोठा गुन्हा आहे. गो हत्येचे परिणाम भोगावे लागतात.

गरुड पुराणानुसार, आई-वडिलांचा अपमान करणं आणि त्यांची उपेक्षा करणं, मोठं पाप आहे. असं करणाऱ्याला मृत्यूनंतर फार यातना सहन कराव्या लागतात.

वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या