वृदांवनमधील संत प्रेमानंद महाराज हे राधा राणीचे भक्त आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
12 June 2025
एका मुलाने किंवा मुलीने लग्नापूर्वी एकमेकांना काय विचारले पाहिजे, असा प्रश्न प्रेमानंद महाराज यांना विचारण्यात आला होता.
प्रेमानंद महाराज म्हणतात, वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी लग्नापूर्वी जोडीदारास काही प्रश्न विचारुन घ्या.
सर्वात आधी ईश्वरास प्रार्थना करा की, भगवंतांनी असा जीवनसाथी द्यावा, जो मन आणि धर्माने तुमच्यासोबत असेल.
महाराज म्हणतात, लग्नापूर्वी पार्टनरला विचारा, तुझे अजून कुठे कोणाबरोबर नाते आहे का? त्यामुळे पारदर्शक आणि भावनात्मक परिस्थिती असणार आहे.
लग्न फक्त दोन व्यक्तींचे मिलन नाही तर दोन परिवाराचे मिलन आहे. त्यामुळे एकमेकांच्या नातेसंबंधात किती महत्व देतात, ते जाणून घेतले पाहिजे.
प्रेमानंद महाराज म्हणतात, तुमच्या पार्टनरची अध्यात्मिक विचारसरणी तुमच्याप्रमाणे असेल तर वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे.
कोणत्याही नात्याचा पाया प्रामणिकपणा आणि विश्वासावर असतो. एका प्रश्नाने तुम्ही नात्यामधील गंभीरता आणि प्रामणिकता ओळखू शकतात.
समोरचा व्यक्ती संकट काळात कसा व्यवहार करतो? यासंदर्भात विचार समोरच्या व्यक्तीने केला पाहिजे. त्याचा स्वभाव आणि समस्यावरुन हे समजू शकते.
हे ही वाचा...
डास चावणार नाही, या स्वस्त वस्तूपासून बनवा क्रीम