रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही या पाच गोष्टी करू नका, नाही तर...

1 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील भाऊ बहिणीचं नातं घट्ट करणारा सण... श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. 

या वर्षी रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्टला साजरा केला जाईल. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करते. 

राखी बांधताना धार्मिक दृष्ट्या काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. नाही तर शुभ पर्वात मिठाचा खडा पडू शकतो. चला जाणून घेऊयात 

शास्त्रानुसार, भद्राकाल आणि राहु काळात राखी बांधण्यास मनाई आहे. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

भावाच्या हातावर तुटलेली किंवा खंडित राखी बांधू नये. तसेच काळी, तपकिरी किंवा गडद रंगांच्या राखी बांधणं शक्यतो टाळा. 

शास्त्रानुसार, राखी बांधताना बहिणीने उत्तरेकडे तोंड करावा. दक्षिण ही यमाची दिशा आहे आणि तिथे तोंड करून बांधणं अशुभ मानलं जातं.

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊबहिणीने काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. पिवळे, केसरी, लाल किंवा हिरवे कपडे परिधान करावेत. 

राखी बांधण्यापूर्वी भावाच्या कपाळावर अख्खे तांदळाचे दाणे वापरावे. तुटलेले दाणे अशुभ मानले जातात. 

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा