21 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
चाणक्य नीतित अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. त्याचा आजही आपल्या जीवनावर तितकाच प्रभाव पडतो.
आयुष्यात माणसाने कितीही कष्ट केले तरी त्याला गोष्टीचं फळ मिळत नाही. याबाबत चाणक्य नीतित सांगितलं आहे.
माणूस कितीही शक्तिशाली असला तरी तो त्याच्या नशिबात असलेलं बदलू शकत नाही. कारण काही गोष्टी जन्माला येण्यापूर्वीच ठरवल्या जातात.
चाणक्य नीतिनुसार, एखाद्या व्यक्तीचं वय किंवा तो किती जगेल हे त्याच्या जन्मापूर्वीच निश्चित केलं जाते.
चाणक्य नीतिनुसार, तुम्ही या आयुष्यात जे काही करत ते तुमच्या मागील जन्माच्या नशिबावर आधारित असते. ते बदलू शकत नाहीत.
या जन्मातील तु्मची आर्थिक स्थिती, तुम्ही किती पैसे कमवाल? हे तुमच्या मागील जन्मातच लिहिलेले असते. त्यावर आर्थिक परिस्थिती ठरते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, आयुष्यात तुम्हाला किती शिक्षण मिळेल हे देखील जन्म घेण्यापूर्वीच ठरवले जाते.
तुमचा मृत्यू देखील जन्म होण्यापूर्वीच निश्चित असतो. जरी कधी होणार माहिती नसलं तरी तो निश्चित असतो.