चाणक्य निती : तरुणपणीच्या या 5 चुकांची किंमत आयुष्यभर भोगावी लागते

26 June 2025

Created By: Atul Kamble

आचार्य चाणक्य यांनी नितीशास्रात तरुणपणीच्या अशा चुकांचा उल्लेख केला आहे ज्याने आयुष्यभर पश्चाताप होतो

 चाणक्य म्हणतात की युवावस्थेत केलेल्या चुका जीवनाची दशा बदलतात, अशी लोकं जीवनभर भोगतात

जे लोक कोणताही विचार न करता वाईट लोकांच्या संगतीत रहातात त्यांना त्याची किंमत भोगावी लागते

जवानीत वेळेचा दुरुपयोग करतात, अशा लोकांपासून यश लांब जाते.इतर लोक त्यांच्या पुढे जातात

काही लोक मेहनत न करता केवल नशीबाच्या भरवशावर राहतात त्यांनाही फारसे काही हाती लागत नाही

चाणक्य म्हणतात की भाग्य चमकण्यासाठी कष्ठ आणि वेळेचा सदुपयोग करायलाच हवा त्याशिवाय काही शक्य नाही.

शिक्षक आपल्याला लहानपणापासून शिस्त शिकवत असतात. शिस्तबद्ध जीवनाशिवाय यश मिळत नाही हे लक्षात ठेवा 

जे लोक भविष्याचे कोणतेही नियोजन न करता केवळ टाईमपास करतात त्यांना पश्चातापाशिवाय काही मिळत नाही