होलिका दहन झाल्यानंतर राखेचे आहेत अनेक फायदे, घ्या जाणून 

Created By: Shweta Walanj

रंगांचा सण होळी देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंग खेळण्याच्या एक दिवस आधी होलिका दहन केलं जातं.

होलिका दहन झाल्यानंतर आपल्या भोवती असलेले सर्व वाईट आणि नकारात्मक गोष्टींचा नाश होतो. तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात.

होलिका दहन झाल्यानंतर राखेचं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल. तर राखेचे काही प्रभावी उपाय आज जाणून घेऊ...

जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर, राख एका लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवली तर परिस्थिती सुधारते... अशी मान्यता आहे.

जर तुमच्या कुटुंबात कोणी सतत आजारी पडत असेल, किंवी कोणाला कोणता आजार असेल, तर राख शरीरावर लावल्याने सर्व रोग दूर होतात.. अशी देखील मान्यता आहे.

राख शिवलिंगावर अर्पित केल्यास तुमच्या कुटुंबात सतत आनंदाचं वातावरण राहतं. सर्व अडचणी दूर होतात.

तुमच्या कमाईत वाढ होत नसेल आणि सतत पैसे खर्च होत असतील तर लाल कपड्यार राख बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवा... तुमचा पाकिट कायम पैशांनी भरलेलं राहिल.. असं देखील सांगितलं जातं.