वास्तूशास्त्राच्या नियमांचे पालन केल्यावर जीवनातील अनेक काम सुकर होतात.
18 July 2025
वास्तूशास्त्रात सुखमय जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. वास्तूशास्त्रानुसार, रात्री झोपण्यापूर्वी काही काम करुन घेणे हितकारक आहे.
माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी तीन गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी कायम राहील.
शास्त्रांनुसार, रात्री झोपण्यापूर्वी घरातील मुख्य दाराजवळील जागा स्वच्छ करुन घ्या. कारण माता लक्ष्मी स्वच्छ असणाऱ्या ठिकाणी वास करते.
उत्तर दिशेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. कारण ही दिशा कुबेर आणि माता लक्ष्मीची मानली जाते.
दिवसा वापरलेली फुले रात्रभर पुजा घरात ठेऊ नये. संध्याकाळी जुने फुले काढून घेतली पाहिजे. त्यामुळे सकारात्मक उर्जा राहते.
शास्त्रांनुसार, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी रात्री घरात कापूर आणि लवंग जाळा. त्यामुळे वातावरण शुद्ध होऊन सकारात्मक उर्जा राहते.
हे ही वाचा... जगातील सर्वात वेगवान इंटरनेट, 1 सेकंदात डाउनलोड होणार पूर्ण Netflix