आर्य चाणक्य हे एक प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. 

4 July 2025

आर्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात यशस्वी जीवनासाठी अनेक टीप्स दिल्या आहेत.

चाणक्य यांनी काही घरांच्या बाबतीत म्हटले आहे. या घरांमध्ये माता लक्ष्मीची कृपा राहत नाही. 

ज्या घरात मूर्खांचा सन्मान होतो, त्या ठिकाणी माता लक्ष्मी थांबत नाही. त्या घरात सुख-शांती राहत नाही. 

ज्या घरांमध्ये भांडणे होतात, त्या घरात माता लक्ष्मीची कृपा राहत नाही. तसेच घरातील लोकांची प्रगती होत नाही.

ज्या घरांमध्ये मोठ्यांचा आदर होत नाही, त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न राहत नाही. 

ज्या घरांमध्ये महिलांचा आदर केला जातो. त्या ठिकाणी लक्ष्मी माता वास करते. महिलांचा आदर आर्थिक समृद्धीचा भाग आहे.

माता लक्ष्मी यांना स्वच्छता आवडते. ज्या घरात स्वच्छता असते त्या ठिकाणी सकारात्मक उर्जा असते. माता लक्ष्मी या घरात थांबते.