10 ऑक्टोबर 2026
Created By: Purva Palande
शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या आराधनेचा अन् नव चैतन्याचा सोहळा.
आदिशक्तीच्या आराधनेचा आणि भक्तीमय उत्सवाचा मंगल सोहळा असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला 11 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.
घटस्थापनेच्या तयारीसाठी मंदिरांमध्ये आणि घराघरांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. या दिवशी घरोघरी विधीपूर्वक घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते.
नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी घट, परडी, माती, सप्तधान्ये, फुले, नैवेद्य आणि पूजेचे साहित्य आवश्यक असते.