08 ऑक्टोबर 2026
Created By: Purva Palande
अकबरच्या अनेक बेगम होत्या, त्या बेगमांमध्ये मरियम-उज-जमानी यांना विशेष स्थान होते.
आख्यायिका आणि चित्रपटांमध्ये त्यांना ‘जोधाबाई’ या नावाने ओळखले जाते.
त्या आमेरचे राजा भारमल यांच्या कन्या आणि राजपूत राजकुमारी होत्या.
अकबर आणि मरियम-उज-जमानी यांचा विवाह 1562 मध्ये राजकीय समझोत्यातून झाला.
मरियम-उज-जमानींना शाही फरमान जारी करण्याचा अधिकारही मिळाला होता.
त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे अकबर त्यांचा विशेष आदर करत होता.