स्वयंपाकघरात जड वस्तू कोणत्या दिशेला असायला हव्यात?

3 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

वास्तुशास्त्रात स्वयंपाक घरात धान्य, डाळी, मोठी भांडी, फ्रिज या जड वस्तू ठेवण्यासाठी दिशा निश्चित केली आहे.

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये जड वस्तू ठेवण्यासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा शुभ मानली जाते. मायक्रोवेव्ह आणि मिक्सर ही विद्युत उपकरणं आग्नेय कोपऱ्यात ठेवावी.

वास्तुशास्त्रात, दक्षिण आणि पश्चिम दिशा पृथ्वी तत्वाशी निगडीत आहेत. या दिशांना जड वस्तू ठेवल्याने स्थिरता आणि संतुलन राहतं. 

या दिशेला जड वस्तू ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात समृद्धी आणि आनंद आणते. 

वास्तुशास्त्रानुसार, अन्नधान्य किंवा किराणा या दिशेला ठेवल्याने अन्नापूर्णा देवी प्रसन्न होते. 

जड वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणी वाढतात. 

स्वयंपाकघराची दिशा वास्तुशास्त्रानुसार नसेल तर जड वस्तू दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवल्याने वास्तुदोष काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

घरात मनी प्लांट ठेवल्याने काय होतं?