4 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
रक्षाबंधनाचं सण या वर्षी 9 ऑगस्टला शनिवारी साजरा केला जाईल.
या दिवशी ग्रहांची आगळीवेगळी युती दिसून येणार आहे.
रक्षाबंधनावेळी भद्रकाळात राखी बांधली जात नाही. ही अशुभ वेळ असते.
रक्षाबंधनाच्या वेळी भद्रा काळ सूर्योदयापूर्वी संपेल.
भद्रा काळ 8 ऑगस्टला दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरु होईल. 9 ऑगस्टला रात्री 1 वाजून 50 मिनिटांनी संपेल.
रक्षाबंधनाच्या सणावेळी भद्रा काळ नसेल. त्यामुळे राखी कोणत्याही वेळी बांधू शकता.
राखी बांधण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणतीही वेळ निवडू शकता.