किचनमध्ये या वस्तू ठेवल्याने नशिबाची चमक वाढते!

20 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार समृद्धी आणि आरोग्याचं केंद्र मानलं जातं. किचनमध्ये काही वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या तर सकारात्मक ऊर्जा वाढते. 

तांबे हा धातू अग्नि तत्त्वाचं प्रतिनिधित्व करते. किचनमध्ये तांब्याच्या वस्तू ठेवल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतात. 

हळद ही गुरु ग्रहाशी निगडीत आहे. यामुळे समृद्धी, विवाह, संतान आणि शिक्षणात प्रगती मिळते. किचनमध्ये हळद असल्यास गुरु ग्रह मजबूत होतो. 

लिंबू आणि मिरची एकत्र बांधल्याने नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष दूर होतो. या वस्तू किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा आणतात. 

धान्य समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. धान्य व्यवस्थित डब्यात झाकून ठेवल्यास अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते. 

गाईचं तूप चंद्र आणि गुरु ग्रह शक्तिशाली करते. यामुळे मानसिक शांती, सौभाग्य आणि घरात लक्ष्मी येण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करते. 

मीठ नकारात्मक ऊर्जा खेचून घेते. त्यामुळे किचनमध्ये काचेच्या डब्यात ठेवल्यास मानसिक तणाव कमी होतो.

जसप्रीत बुमराह एक मोठा विक्रम मोडणार, काय ते वाचा