21 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. आपल्या कर्मानुसार शनिदेव फळं देतात.
शनिदेवांची कृपा असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती होताना दिसते. चला जाणून शनिदेवांना प्रसन्न करण्याचे उपाय
शनिदेवांची कृपा व्हावी यासाठी शनिवारी पिंपळाच्या वृक्षाला जल आणि काळे तीळ अर्पण करावे.
शनिदेवांच्या प्रतिमेसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनिदेवांची कृपा होते.
शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी 'ओम शं शनैश्चराय नम:' या मंत्राचा जप करावा.
शनिदेवांना काळी गाय प्रिय आहे. त्यामुळे या गाईला भाकरी द्या.
शनि मंदिरात शनिदेवांच्या पायावर मोहरीचं तेल अर्पण करा आणि मनोभावे पूजा करा.