गेले 45 दिवस सुरु असलेल्या महाकुंभाचा समारोप झाला. 66 कोटी भाविकांनी संगमावर स्नान केले.
27th Feb 2025
महाकुंभातून नागा साधू धर्मनगरी काशीला पोहचले. महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी निरंजनी नागा साधूंच्या अखाडाचे पीठाधीश्वर आहे.
नागा साधूंकडे कोणतेही साधन नसते. मग त्यांनी कुंभ कधी सुरु होणार? त्याची माहिती कशी मिळते, त्याबद्दल कैलाशानंद गिरी यांनी एका मुलाखतीत माहिती दिली.
मोबाईल, घड्याळ, कॅलेंडर काहीच नागा साधूंकडे नसते. संदेशाची देवानघेवानही होत नाहीत.
महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी म्हणतात, हा एक मोठा विषय आहे. कुंभाची सूचना-निमंत्रण ईश्वर त्या नागा साधूंना देते. कारण नागा सर्वात मोठे साधक असतात.
ईश्वराकडून नागा साधूंना कळते, कुंभाची वेळ आली आहे. तुम्हाला जावे लागणार आहे.
नागा साधू हिमालयातील जंगलांमध्ये तप करतात. भजन करतात. जेव्हा देशावर संकट आले तेव्हा नागा साधूंनी जबाबदारी घेतली, असे कैलाशानंद गिरी म्हणतात.
कुंभानंतर नागा साधू पुन्हा आपल्या गुफांमध्ये जातात. पुन्हा परत दुसऱ्या महाकुंभातच येतात.
हे ही वाचा... सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावे? प्रेमानंद महाराज यांनी सांगितला सोपा उपाय