भगवंतांचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा, असे प्रत्येकाला वाटत असते.

24 June 2025

वृदांवन येथील संत प्रेमानंद महाराज यांनी भगवंत आपल्या सोबत असल्याचे कसे ओळखावे, त्यासंदर्भात माहिती दिली. 

कोणी किती गुन्हा केला तरी क्षमा करावी, असे जेव्हा आपण करतो तेव्हा ईश्वर आपल्या सोबत असल्याचे लक्षण आहे. 

ज्यांच्यावर भगवंतांची कृपा असते, तो व्यक्ती बाहेरुन आणि आतून पवित्र असतो. त्या व्यक्तीच्या मनात कोणतेही कपट नसते. 

भगवंतांची कृपा असेल तर तो व्यक्ती भजनातून स्वत:साठी काही मागणार नाही. दुसऱ्यांच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना करेल. 

कोणताही व्यक्ती किंवा प्राणी सर्वांसाठी करुणा भाव असणे हे देखील देव आपल्यासोबत असण्याचे एक लक्षण आहे.

एखाद्याबद्दल करुणा आणि मैत्रीची भावना असणे हे चांगल्या वर्तनाचे लक्षण मानले जाते.