शनि जयंतीच्या रात्री करा हे उपाय; शनिदेवाच्या कृपेनं पूर्ण होतील इच्छा-आकांक्षा

27 May 2025

Created By: Swati Vemul

ज्येष्ठ अमावस्येला म्हणजेच आज 27 मे रोजी शनि जयंती आहे

शनि जयंतीला शनिदेवाची उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात, असं म्हटलं जातं

शनि जयंतीच्या रात्री खास उपाय केल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होत असं मानलं जातं

शनि जयंतीच्या संध्याकाळी काळे तीळ, काळे कपडे, मोहरीचं तेल दान केल्याने शनि महादशा कमी होते

शनिदेवाच्या नावाने घराच्या दाराजवळ दिवा लावावा आणि 108 वेळा 'ऊं शं शनैश्चराय नम:' या मंत्राचा जप करावा

शनि जयंतीपासून शनिवारच्या संध्याकाळपर्यंत रोज काळ्या मुंग्यांना आणि काळ्या कुत्रांना प्रसाद खायला द्यावा

असं केल्याने प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल

शनि जयंतीदिनी शनिदेवासोबतच हनुमानाचीही उपासना करावी

घरातल्या देवाऱ्यात हनुमानाच्या नावाने चौमुखी दिवा लावावा

शनि जयंतीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि त्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा

घरात 'या' दिशेला पैसे ठेवणं मानलं जातं अशुभ; कमाईवर होतो वाईट परिणाम