हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरातील कुंडीत किंवा अंगणात तुळस असते.
24 June 2025
तुळस आध्यात्मिक महत्वाबरोबर गुणकारी औषधसुद्धा आहे. अनेक आरोग्यदायी गुणधर्म तुळशीत आहेत.
तुळशीचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे मिळतात. तुळशीचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
तुळसचे पाणी सेवन केल्यास मन शांत राहते. त्यामुळे तणाव जाऊन आराम मिळतो.
तुळशीच्या पाण्यात अनेक असे पोषक तत्व आहेत, ज्यामुळे तुमची प्रतिकारक्षमता वाढते. अनेक आजारांसोबत लढण्यास ते फायदेशीर आहे.
तुळस शरीरातील टॉक्सिंस बाहेर काढते. त्यामुळे शरीर डिटॉक्सिफाई करण्यासाठी तुळशीचा चांगला उपयोग होतो.
तुळशीचे पाणी सेवन केल्यावर गॅस, फोट फुगणे अशा समस्यांपासूनही सुटका मिळते.
तुळशीच्या पाण्यामुळे खोकला, दमा दूर होण्यास मदत होते. फुफ्फुसासाठी हे फायदेशीर आहे.
तुळशीचे पाणी सकाळी घेऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करु शकतात किंवा संध्याकाळीही हे पाणी घेऊ शकतात.
तुळशीचे पाणी बनवण्यासाठी काही पाने गरम पाण्यात टाका. पाणी उकळल्यावर तुळशीचे पाणी तयार झालेले असेल.
हे ही वाचा... दृष्ट लागल्यामुळे शुभ कार्य थांबतात का? प्रेमानंद महाराज यांनी दिले उत्तर