वास्तुशास्त्रात घराची नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा विकसित करण्याचे उपाय सांगितले आहेत.
22 June 2025
ज्योतिष शास्त्राची वास्तुशास्त्र शाखा आहे. त्यानुसार दुकानाच्या तिजोरीत हळदीचा तुकडा ठेवणे फायदेशीर आहे.
हिंदू धर्मात हळदीला शुभ मानले जाते. हळद संपत्तीला आकर्षित करते. यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
हळद तिजोरीत ठेवल्यास सभोवतालची नकारात्मक ऊर्जा काढून टाकली जाते. ज्यामुळे पैशाच्या आगमनाचा मार्ग मोकळा होतो. खर्च नियंत्रणात राहतो.
दुकानाच्या तिजोरीत हळद ठेवल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात. ग्राहकांचा ओघ वाढतो. त्यामुळे फायदा वाढतो.
हळदीची गाठ गंगाजलाने धुवून लाल कापडात गुंडाळा. हा लाल कपडा तुमच्या दुकानाच्या तिजोरीत ठेवा.
तिजोरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे लाल रंगाच्या कापडाचे महत्व आहे.
हे ही वाचा... दृष्ट लागल्यामुळे शुभ कार्य थांबतात का? प्रेमानंद महाराज यांनी दिले उत्तर