Vastu Tips : घरातील कोणत्या दिशेला घडी लावावी? योग्य दिशा कोणती?
18 मे 2025
Created By: संजय पाटील
वास्तू शास्त्रात दिशेला फार महत्त्व आहे. चुकीच्या दिशेला घडी लावल्यास अडचणीत वाढ होऊ शकते
घड्याळ वेळ दर्शवण्यासह भितींची शोभाही वाढवते
वास्तुशास्त्रानुसार, घडी घरातील उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेला लावावी, या 3 दिशा घडी लावण्यासाठी उत्तम असल्याचं म्हटलं जातं
वास्तुशास्त्रानुसार, घरातील दक्षिण दिशेला आणि मुख्य दारावर घडी लावणं अशुभ समजलं जातं, त्यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो
आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी घरात सफेद, आकाशी, हिरवा आणि क्रीम रंगाचा घड्याळ लावावा, अशी मान्यता आहे
वास्तूशास्त्रानुसार,घरात वर्तुळाकार घडी लावावी, अन्य आकाराच्या घडी लावू नये
वास्तूशास्त्रानुसार, घरात तुटलेलं, बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये. तुटलेलं आणि बंद पडलेलं घड्याळ लावल्याने घरात अनेक समस्या येऊ शकतात
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा